Ad will apear here
Next
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश
आदित्य श्रीवास्तव आपल्या बक्षिसांसोबतमुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल युनिफाइड कौन्सिलच्या ‘एनएसटीएसई’च्या २०१७च्या परीक्षेमध्ये सातवा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याला गौरवण्यात आले.

आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका रूपल कनकिया म्हणाल्या, ‘आम्ही आदित्यला मिळालेल्या यशामुळे अतिशय आनंदित आहोत. आदित्यने फक्त त्याच्या शाळेचे व पालकांचेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचेही नाव मोठे केले आहे.’

‘एनएसटीएसई’ ही अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धात्मक परीक्षा आहे. ‘युनिफाइड कौन्सिल’कडून ही परीक्षा भारतात आणि इतर १६ देशांमध्ये एकाच वेळी घेतली जाते. लॉजिकल रीझनिंग आणि कम्प्युटरबद्दलचे विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZGLBB
Similar Posts
दादाराव नांगरेचे उज्ज्वल यश उल्हासनगर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात राहणारा दादाराव पंजाबराव नांगरे हा विद्यार्थी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन शिबिरात झालेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या शिबिरात सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. उपमहापौर
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत
ब्रिटिशकालीन दुर्मीळ ग्रंथ, गॅझेटिअर्सचा खजिना खुला मुंबई : राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिअर) विभागामार्फत इतिहास संशोधक दिवंगत सेतुमाधवराव पगडी यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, दीडशे वर्षांपासूनचे साडेतीन हजार दुर्मीळ ग्रंथ, जिल्हा गॅझेटिअर्सही येथे आहेत. याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.
सागर देशमुख आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत मुंबई : ‘भाई’ चित्रपटात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर..महामानवाची गौरव गाथा’ ही मालिका १५ एप्रिलपासून रात्री नऊ वाजता सुरू होत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language